Ranji trophy; दिग्गज खेळाडूंनी भरलेली मुंबई अवघ्या 120 धावांत सर्वबाद, जम्मू काश्मीरची शानदार गोलंदाजी

भारतीय क्रिकेट संघाची कसोटीमधील निराशाजनक कामगिरी पाहता, बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेणे अनिवार्य केले होते. यानंतर बीसीसीआयने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करताना भारतीय संघातील स्टार खेळाडू रणजी सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला. पण रणजी ट्राॅफीमध्ये खेळतानाही खेळाडूंची फ्लाॅप कामगिरी पाहायला मिळाली. विशेषकरुन मुंबई संघाकडून खेळत असलेले स्टार खेळाडू सपेशल फ्लाॅप ठरले. रणजी ट्राॅफीच्या दुसऱ्या खेळल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीर विरुद्ध मुंबई सामन्यात मुंबई संघ अवघ्या 120 धावांत सर्वबाद झाला आहे.

वास्तविक रणजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात आज मुंबईचा सामना सध्या जम्मू काश्मीर विरुद्ध सुरू आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेने टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण तो त्याच्यावरच उलटला. संघाची टाॅप ऑर्डर अवघ्या 40 धावांत कोसळली. यानंतरही संघाच्या विकेट्स सातत्याने जात राहिल्या, परिणामी संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचता आले नाही आणि केवळ 120 धावांवर संघ सर्वबाद झाला. मुंबई संघामध्ये अनेक दिग्गज फलंदाज खेळत आहेत. ज्यात रोहित शर्मा (03), अजिंक्य रहाणे (12), श्रेयस अय्यर (11), यशस्वी जयस्वाल (4), शिवम दुबे (0), इतके महान खेळाडू असतानाही संघाला केवळ 120 धावा करता आल्या. संघाकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 51 धावा केल्या.

जम्मू काश्मीरच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास उमर नझीर मीर आणि युधवीर सिंग चरक यांनी मुंबईच्या फलंदाजांना पाणी पाजलं. दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. तर औकिब नबी दारनेही 2 बळी पटकावले.

भारताला 6 फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. त्यानंतर 19 फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारतीय खेळाडूंची आवस्था पाहून चाहत्यांना मात्र धडकी भरली आहे. पण या स्पर्धेला आणखी वेळ असल्याने भारतीय खेळाडूंकडे पुरेसा वेळ आहे. ज्यामुळे ते पुन्हा आपली लय मिळवतील.

हेही वाचा-

Ranji trophy; महाराष्ट्राला मोठा धक्का, अंपारच्या निर्णयाचा निषेध केल्याने या खेळाडूवर बंदी
पाकिस्तानच्या गोलंदाजानं केला ‘पुष्पा’ स्टाईल सेलिब्रेशन, VIDEO भन्नाट व्हायरल
रणजीमध्येही रोहित शर्मा फ्लाॅप, गिल-जयस्वालनेही गंभीरची डोकेदुखी वाढवली

Comments are closed.