ऋषभची नक्कल, ‘कांतारा’तील देवतेला म्हणाला भूत; रणवीर सिंहवर नेटकरी भडकले

दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ चित्रपट सुपरहिट झाला. अलीकडेच आलेला त्याचा ‘कांतारा चॅप्टर 1’ ही गाजला. ‘कांतारा’ची गोष्ट कर्नाटकमधील तुलू समाजाच्या देवांवर आधारित आहे. तेथील लोकांची त्यांच्या देवांवर खूप श्रद्धा आहे. यामुळेच दरवर्षी ते लोक देवी-देवतांचा सण उत्साहात साजरा करतात. अभिनेता रणवीर सिंहने ‘कांतारा’तील देवीचा उल्लेख ‘भूत’ असा उल्लेख केला. यामुळे नेटकरी चिडले आहेत.

गोवा फिल्म फेस्टिवलला रणवीर सिंह उपस्थित होता. त्याच्या आगामी ‘धुरंधर’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो आला होता. या वेळी त्याने समोर बसलेल्या ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ची स्तुती केली. या वेळी त्याने ऋषभची नक्कलही केली. रणवीर म्हणाला, ‘‘मी तुझा सिनेमा थिएटरमध्ये बघितला आणि खरे सांगू तर तुझा अभिनय शानदार होता. विशेषतः जेव्हा तुझ्या अंगात फीमेल भूत येते तो एक शॉटच भारी होता. तुम्ही ‘कांतारा’ पाहिला का? तो शॉट पाहिला का? कोणाला मला ‘कांतारा 3’ मध्ये बघायची इच्छा आहे? याला सांगा.’’ चावुंडी देवीचा उल्लेख फीमेल भूत असा केल्याने नेटकऱयांनी रणवीरला धारेवर धरले आहे.

Comments are closed.