रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद, रिलीजपूर्वीच कमावले इतके कोटी
रणवीर सिंगचा धुरंधर -२ हा प्रदर्शनाआधीच चांगला चर्चेत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला सुरुवात होताच तिकीट विक्रीला जोरदार वेग मिळाला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पेड प्रिव्ह्यूसाठी सुरू झालेल्या आगाऊ बुकिंगमध्ये एका दिवसापेक्षा कमी वेळात १.२ लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. तसेच या तिकिट विक्रीमधून चित्रपटाने १३.२६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे चित्रपटाच्या रिलीजला अजून काही दिवस बाकी असतानाच ही कमाई झाली आहे.
केवळ हिंदी भाषेत या चित्रपटाची ७.९५ कोटी रुपयांची आगाऊ कमाई झाली आहे. एकूण आकडेवारी पाहता, ‘धुरंधर २’ने २०२६ मधील काही हिंदी चित्रपटांच्या आगाऊ कमाईलाही मागे टाकले आहे. हा चित्रपट १९ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून हिंदीसह तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या दक्षिण भारतीय भाषांमध्येही रिलीज केला जाणार आहे. सध्या सुरू असलेली आगाऊ बुकिंगची गती पाहता, रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘धुरंधर २’ बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आगाऊ बुकिंगच्या बाबतीत, धुरंधर २ ला भारतातील बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतच्या टॉप ५ तिकीट विक्री करणाऱ्या चित्रपटांना आव्हान देण्यास सज्ज झाला आहे. यात आघाडीवर हॉलिवूडचा चित्रपट – रुसो ब्रदर्सचा २०१९ चा मार्वल चित्रपट ‘अॅव्हेंजर्स: एंडगेम’ आहे. या चित्रपटाची तब्बल १५ लाख तिकिटे विकली गेली होती. तसेच केवळ आगाऊ बुकिंगमध्ये ३५ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. तसेच आगाऊ बुकिंगमध्ये सर्वाधिक तिकिटे विक्री झालेला भारतीय चित्रपट म्हणजे एसएस राजामौलीचा २०१७ चा तेलुगू अॅक्शन महाकाव्य ‘बाहुबली २: द कन्क्लुजन’, हा होता. या चित्रपटाची ६ लाख ५० हजार तिकिटविक्री झाली होती.
Comments are closed.