ठाकरेंची ही शेवटची निवडणूक, निवडणुकीनंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते रागणार नाही, दानवेंचा दावा
रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंवर भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उद्धव ठाकरेंवर ( Uddhav Thackeray ) जोरदार टीका केली आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले की, मागच्या निवडणुकीचा मी साक्षीदार आहे, तेंव्हा मी अध्यक्ष होतो. मागच्यावेळी एकत्र सरकार चालवत असल्यामुळं आम्ही त्यांना पालिका दिली होती. नाहीतर आम्ही आमचा महापौर बसवला असता असे दानवे म्हणाले. ठाकरेंची ही निवडणूक शेवटची आहे, निवडणुकीनंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते राहणार नाहीत. कार्यकर्ते आपलं आपलं भविष्य स्वीकारतील असे दानवे म्हणाले.
नवाब मलिक यांनी जेलमध्ये गेले तरी राजीनामा दिला नव्हता, पण माणिकराव यांनी दिला
माणिकराव कोकाटे यांच्याबाबतही त्यांना विचारण्यात आले. यावेळी दानवे म्हणाले की, त्यांनी राजीनामा दिला आहे. अजित पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला होता. मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही हे आमच्या सरकारने दाखवून दिल्याचे दानवे म्हणाले. नवाब मलिक यांनी जेलमध्ये गेले तरी राजीनामा दिला नव्हता, पण माणिकराव यांनी राजीनामा दिल्याचे दानवे म्हणाले. काल त्यांचा निकाल झाला आणि ते अॅडमिट झाले होते. जे झालं ते नियमाने झाल्याचे दानवे म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्याबाबत सुप्रिया सुळे यांची दुष्मानी असण्याचं काय कारण ?
धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार का? याबाबत देखील विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, या सगळ्या बातम्या आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेतील. हा निर्णय मी घेऊ शकत नाही असे दानवे म्हणाले. धनंजय मुंडे यांच्याबाबत सुप्रिया सुळे यांची दुष्मानी असण्याचं काय कारण आहे? असा सवाल देखील दानवेंनी केला. 75 वर्षात सुप्रिया सुळे यांनी कधीच उपोषण केलं नव्हते. उपोषण करण्याची पाळी सुप्रिया सुळे यांच्यावर अनेक वेळा येणार आहे असेही दानवे म्हणाले.
राज्यात 29 महानगरपालिकांच्या निडणुकांचे बिगुल वाजले
राज्यात 29 महानगरपालिकांच्या निडणुकांचे बिगुल वाजले आहे. 15 जानेवारीला यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 16 जानेवारीला या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळं राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मोठ्या प्रमाणात सध्या भाजपमध्ये पक्ष प्रवेश होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
पिंपरी चिंचवडमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा पक्षाला रामराम, लवकरच भाजपमध्य प्रवेश
आणखी वाचा
Comments are closed.