IRS अधिकाऱ्याच्या मुलीचा बलात्कार आणि खून, फीडबॅक पाठवा

दिल्लीत धक्कादायक घटना : मोबाइल चार्जरने आवळला गळा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीसोबत तिच्याच घरात क्रौर्य करण्यात आले आहे. आयआयएस अधिकाऱ्याच्या 21 वर्षीय मुलीचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. हत्येपूर्वी तिच्यारव बलात्कार करण्यात आला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत असून प्रारंभिक तपासात घरातील कामगारावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. या कामगाराला अलिकडेच कामावरून हटविण्यात आले होते.

दिल्लीच्या अमर कॉलनीत एका आयआरएस अधिकाऱ्याच्या घरात त्याच्या मुलीची हत्या झाली आहे. या मुलीचा गळा मोबाइल चार्जरच्या वायरद्वारे गळा आवळण्यात आला आहे. चार्जर तिच्या मृतदेहानजीकच ठेवण्यात आला होता.

घरात होती एकटीच

मुलीचे आईवडिल मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले असताना ही घटना घडली आहे. संशयास्पद स्थितीत परिवाराच्या लोकांना मुलीचा मृतदेह घरात आढळून आला होता. याची माहिती मिळताच पोलीस तेथे दाखल झाले. प्रारंभिक तपासात मुलीचा गळा आवळण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे संकेत मिळाले आहेत. मृत युवतीचे वय सुमारे 21 वर्षे असून घटनेवेळी ती घरात एकटीच होती असे कुटुंबीयांचे सांगणे आहे.

नोकरावर संशय

संबधित घरात पूर्वी काम करणाऱ्या आणि सुमारे एक महिन्यापूर्वी कामावर कमी करण्यात आलेल्या नोकरावर पोलिसांना संशय आहे. राकेश मीणा हा संशयित फरार आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करत अनेक पथकांची स्थापना करत संशयिताचा शोध चालविला आहे. उत्तरीय तपासणी आणि फॉरेन्सिक तपासानंतरच घटनेचा पूर्ण उलगडा होऊ शकेल असे पोलिसांनी सांगितले आहे.

 

Comments are closed.