रशीद खान ठरला वनडे क्रिकेटमधील नंबर-1 गोलंदाज! केशव महाराजचा रेकॉर्ड उध्वस्त

रशिद खान (Rashid Khan) 50 षटकाच्या फॉरमॅटमध्ये जगातील नवीन नंबर वन गोलंदाज बनला आहे. बांगलादेशविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने जबरदस्त कामगिरी करत केशव महाराजची (Keshav Maharaj) बादशाहत संपवली आहे.

नोव्हेंबर 2024 नंतर रशिदने हे टॉप स्थान पटकावलं आहे. अफगाणी फिरकीपटूच्या फिरत्या गोलंदाजीसमोर बांग्लादेशचे फलंदाज दम तोडताना दिसले.
रशिदने 3 सामन्यांत एकूण 11 विकेट्स घेतल्या आणि टीमला 3-0 ने विजय मिळवून दिला.

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत केलेल्या अप्रतिम कामगिरीचं बक्षीस म्हणून रशिदला ICCच्या ताज्या वनडे रँकिंगमध्ये नंबर वन गोलंदाज म्हणून मान्यता मिळाली. जवळपास 11 महिन्यांनंतर रशिद पुन्हा एकदिवसीय फॉरमॅटमध्ये जगाचा नंबर वन गोलंदाज बनला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या स्पिनर केशव महाराजची नंबर एकची जागा ताब्यात घेतली.

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत रशिदचा खेळ अप्रतिम होता. त्याने तीन सामन्यांत एकूण 11 विकेट्स घेतल्या. अबु धाबीमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडेमध्येही रशिदने 6 षटकात फक्त 12 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. पहिल्या वनडेमध्ये त्याने 3 आणि दुसऱ्या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या.

पहिल्यांदा फलंदाजी करत अफगाणी संघाने 50 षटकांमध्ये 9 विकेट्स गमावून 293 धावा केल्या. मात्र, प्रत्युत्तरात बांग्लादेशचा संघ फक्त 93 धावांत कोलमडली. संघाचे 10 फलंदाज दहाच्या पुढेही धावा करू शकले नाहीत. यापूर्वी टी-20 मालिकेत बांगलादेश 3-0 विजयी ठरला होता.

Comments are closed.