राशिद खानने रचला इतिहास, भारतीय गोलंदाजाचा मोठा विक्रम केला धुळीस मिळवला

अफगाणिस्तानचा कर्णधार आणि संघाचा स्टार फिरकी गोलंदाज रशीद खानने आशिया कप 2025 मध्ये इतिहास रचला आहे. तो या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला मागे टाकले आहे. आता टी20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम रशीद खानच्या नावावर आहे. रशीद खानने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हा विक्रम केला.

रशीद खानबद्दल बोलायचे झाले तर, त्याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात प्रथम सैफ हसनला बाद केले. या विकेटसह त्याने भुवनेश्वर कुमारची बरोबरी केली. त्यानंतर, त्याने 16व्या षटकात शमीम हुसेनला बाद केले. हुसेनची विकेट घेताच, रशीद खानने टी20 आशिया कपमध्ये विकेट्स घेण्याच्या बाबतीत भुवनेश्वर कुमारला मागे टाकले. भुवनेश्वरने टी20 आशिया कपमध्ये 13 विकेट्स घेतल्या. त्याच वेळी, रशीद खानच्या नावावर आता 14 विकेट्स आहेत.

टी-20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

राशिद खान – 10 सामने: 14 विकेट्स
भुवनेश्वर कुमार – 6 सामने: 13 विकेट्स
वानिंदू हसरंगा – 8 सामने: 12 विकेट्स
अमजद जावेद – 7 सामने: 12 विकेट्स
हार्दिक पांड्या – 10 सामने: 12 विकेट्स

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात रशीद खानची कामगिरी तितकी चांगली नव्हती, ज्यात त्याने 24 धावा देऊन फक्त एक विकेट घेतली. पण बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने जबरदस्त पुनरागमन केले. येथे त्याने 4 षटकांच्या कोट्यात फक्त 26 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या.

बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर बांगलादेशने अफगाणिस्तान संघासमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले. बांगलादेशकडून तन्जीद हसन तमीमने सर्वाधिक 52 धावा केल्या. सैफ हसनने 30 धावा आणि तौहिद हृदयॉयने 26 धावा केल्या. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, रशीद खान व्यतिरिक्त नूर अहमदनेही दोन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला केवळ 146/10 धावा करता आल्या. आश्याप्रकारे बांग्लादेशने हा सामना 8 विकेट्सनी जिंकला.

Comments are closed.