‘चारकोपचा राजा’तर्फे सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम; रश्मी ठाकरे यांचीही उपस्थिती
![rashmi thackeray](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/rashmi-thackeray--696x447.jpg)
कांदिवली पश्चिम येथील ‘चारकोपचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित माघी गणेशोत्सवात गणेशभक्त आणि रहिवाशांना सांस्पृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली. या कार्यक्रमास रश्मी ठाकरे यांनीदेखील उपस्थिती लावून बाप्पाचे दर्शन घेतले. शिवसेनेच्या माजी नगरसेविका शुभदा गुढेकर आणि वॉर्ड क्र.19 चे शाखाप्रमुख निखिल गुढेकर यांच्या वतीने या सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले.
‘चारकोपचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने साजरा होणाऱया उत्सवाचे या वर्षी विसावे वर्ष आहे. या उत्सवाच्या निमित्ताने 1 फेब्रुवारीपासून सात दिवस श्रींच्या मूर्ती प्रतिष्ठापनेपासून गणेश जन्म सोहळा, भजन, श्री गणेश याग, सत्यनारायण महापूजा,‘ अवघा रंग गणरंग’ असे विविध कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडले. याशिवाय मंडळाच्या वतीने आयोजित हळदीकुंपू कार्यक्रमाला तीन हजार महिलांनी उपस्थिती लावली. तर पाच हजारांवर भाविकांनी महाप्रसादाला लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी विभागप्रमुख, विधानसभा संघटक, शाखाप्रमुखांसह शिवसैनिक, कार्यकर्ते, महिला आघाडीने उपस्थिती लावली.
Comments are closed.