हात-पाय घट्ट बांधलेली निवृत्त शिक्षिकेची बेडवर सापडली बॉडी; मैत्रिणीसोबत फिरायला जाणार होत्या,
रत्नागिरी: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूण येथे सेवानिवृत्त शिक्षिकेचा राहत्या घरीच खून झाल्याची धक्कादायक घटना घडली समोर आली आहे. या हत्याकांडामुळे चिपळूणमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. वर्षा जोशी (63 वर्षे) असं या सेवानिवृत्त शिक्षिकेचं नाव आहे. एकट्या राहणाऱ्या या निवृत्त शिक्षिकेचा चोरीच्या उद्देशाने खून झाल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वर्षा जोशी या त्यांच्या मैत्रिणींसोबत फिरायला जाणार होत्या, मैत्रिणी त्यासाठी त्यांना फोन करत होत्या मात्र, त्या फोन उचलत नव्हत्या, त्यामुळे त्यांच्या मैत्रिणीने त्यांच्या शेजाऱ्यांना फोन केला आणि माहिती घेण्यासाठी सांगितलं, त्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिल्यावर वर्षा जोशींच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना कळवली, चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
काय झालं नेमकं?
वर्षा जोशी या त्यांच्या मैत्रिणींसोबत फिरायला जाणार होत्या, मैत्रिणी त्यासाठी त्यांना फोन करत होत्या मात्र, त्या फोन उचलत नव्हत्या, त्यामुळे त्यांच्या मैत्रिणीने त्यांच्या शेजाऱ्यांना फोन केला. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिलं असता, त्यांना महिलेचा मृतदेह सापडला. यावेळी तिचे हातपाय घट्ट बांधलेले होते. मृत्यू होण्यापूर्वी वर्षा जोशी यांनी प्रतिकार केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली, त्यांच्या घरात सीसीटीव्ही लावण्यात आले होते. त्यांच्या घरातील सीसीटीव्ही फूटेज डीव्हीआरही गायब करण्यात आले आहे. हा खून चोरीच्या उद्देशाने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महिलेच्या पतीचे अकरा वर्षांपूर्वी निधन झालं आहे. त्यांना कोणतेही आपत्य नव्हते. त्या घरी एकट्याच राहत असत.
पतीच्या निधनानंतर एकट्याच होत्या घरी…
वर्षा जोशी या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या, त्यांना मूलबाळ नव्हतं, पतीच्या निधनानंतर त्या एकट्याच घरी राहत होत्या. काल (गुरुवारी 7 ऑगस्टला) फिरण्यासाठी म्हणून आपल्या मैत्रिणीसोबत त्या हैदराबादला जाणार होत्या. मैत्रीण त्यांना वारंवार फोन करत होती. पण त्या उचलत नव्हत्या. अखेर त्या मैत्रिणीने शेजान्यांशी संपर्क साधला आणि सेवानिवृत्त शिक्षिकेचा खून नंतर उघड झाला. अंगावर कसल्याही खुणा नव्हत्या. पण बेडरूमध्ये पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह पडलेला होता, घराचा मागचा उघडा दरवाजा ही परिस्थिती हा खून आहे, असावा हे दाखवतो. वर्षा वासुदेव जोशी या आपल्या आयुष्यातील काही क्षण मैत्रीणीसोबत आनंदाने घालण्यासाठी फिरायला जाणार होत्या. मात्र त्याआधीच्या काळाने त्यांच्यावर घाला घातला.
चोरी का होती?
वर्षा जोशी यांच्या घरातील कपडे घरात पडलेले होते. त्यांच्या मृतदेहाजवळ मंगळसूत्र व अन्य काही दागिने आढळून आलेले आहेत. मात्र घरातील इतर दागिने अथवा किमती वस्तू चोरीस गेल्या आहेत का, याचा शोधही पोलिस घेत आहेत.
खूनच झाल्याची प्राथमिक शक्यता
वर्षा जोशी यांच्या अंगावरील कपडे फाटलेल्या स्थितीत होते. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर व्रण दिसत होते. याशिवाय घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून नेण्यात आला आहे. त्यामुळे हा खूनच असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. मात्र हा खून कोणी केला आणि कशासाठी केला गेला, हे स्पष्ट झालेले नाही.
आणखी वाचा
Comments are closed.