Kokan News – परदेशांतील रत्नांग्रीकरांची यंदा हॅप्पी दिवाळी! घरात बनवलेला खमंग फराळ पोस्टाने परदेशात पाठवता येणार

नोकरीच्या निमित्ताने किंवा शिक्षणासाठी अनेक जण परदेशात जातात. परदेशात राहत असल्याने घरच्या अंगणात साजऱ्या होणाऱ्या दिवाळीला हि मंडळी मुकतात. यंदा मात्र पोस्ट ऑफिसने परदेशात रहाणाऱ्या मंडळींच्या आयुष्यात ‘हॅप्पी दिवाळी’आणली आहे. पोस्ट ऑफिस मधून फराळ परदेशात पाठवता येणार आहे. घरात बनवलेल्या खमंग आणि खुसखुशीत फराळाचा आस्वाद आता परदेशात राहत असलेल्य ‘रत्नांग्रीतील’ मंडळींना घेता येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेकजण शिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेशात आहेत. त्यांना दिवाळीत आपल्या घरचा फराळ मिळावा यासाठी पोस्ट ऑफीस मार्फत परदेशात फराळ पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.फराळ पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिसने आपले दरपत्रक जाहीर केले आहे.

फराळ परदेशात पाठविण्यासाठी काही निवडक देशांसाठी ५ किलो पार्सलचे दर पुढीलप्रमाणे आहेत.

देश दर
1 ऑस्ट्रेलिया 7 हजार 49 रुपये
2.       कॅनडा         ५ हजार २६ रुपये
3. यू.ए.ई. 1 हजार 49 रुपये
4. यू.के. 7 हजार 537 रुपये
5. जर्मनी 3 हजार 49 रुपये.

या देशाव्यतिरिक्त इतर देशांमध्ये देखिल पार्सल पाठविता येईल. त्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफीसला संपर्क करावा, असे डाकघर अधीक्षक ए.डी. सरंगले यांनी कळविले आहे. रत्नागिरी व चिपळूण प्रधान डाकघर येथे फराळ पॅकिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

Comments are closed.