गॅस सिलिंडरच्या आश्वासनाचा फक्त धूर, हॉटेलमध्ये पेटल्या चुली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण-इस्त्रालय आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे हिंदुस्थानात सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यवसाय संकटात सापडला आहे. हॉटेल व्यावसायिकांना गॅस सिलिंडर देण्याच्या आश्वासनाचा फक्त धूर निघाला आहे. हॉटेल व्यावसायिकांनी चूल पेटवून त्यांचं जगण्याशी नवं युध्द सुरू केले आहे. ज्या हॉटेल व्यावसायिकांना चूल मांडणे शक्य नव्हती त्यांनी हॉटेलची शटर खाली ओढली आहेत.

व्यवसायिक एलपीजी गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल, खानावळी हे व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.अनेक हॉटेल व्यवसायिकांनी चुली पेटवल्या आहेत.चुलीवरच्या खाद्यपदार्थांना मर्यादा येत असल्याने अनेक हॉटेल व्यवसायिकांना मेनूकार्ड गुंडाळून ठेवावी लागली आहेत.जेमतेम कांदापोहे,उपमा,शिरा, चहा, शाकाहारी किंवा मांसाहारी थाळी इथपर्यंतच ऑर्डर स्वीकारल्या जात आहेत.

व्यवसायिक सिलेंडर मिळेल या आशेवर अजूनही काही हॉटेल व्यावसायिक आहेत.मात्र पुढील आठवड्यात एलपीजी गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्यास काही हॉटेल बंद होण्याची दाट शक्यता आहे.हॉटेल आणि खानावळीत जेवणाऱ्या मंडळींसमोरही संकट उभे राहिले आहे.

“अतिथी देवो भव” म्हणत गणपतीपुळ्यात पर्यटकांना चुलीवरचे जेवण

गणपतीपुळ्यात मोठा हॉटेल व्यवसाय आहे.परीक्षा संपत चालल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे अशावेळी ‘अतिथी देवो भव’ असं म्हणत गणपतीपुळ्याच हॉटेल व्यवसायिकांनी चुली पेटवून ग्राहकांना अन्नपदार्थ देण्याची सेवा सुरू ठेवली आहे.

Comments are closed.