खेड नगरपरिषदेत महायुतीची एकहाती सत्ता, शिवसेनेला 17 तर भाजपला 3 जागा, मविआचा दारुन पराभव

रत्नागिरी खेड नगर परिषद निवडणूक : गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने खेड नगरपरिषद निवडणुकीत 21-0 असा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. खेड नगरपरिषदेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर खेडमध्ये कोणाची सत्ता येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, निकाल जाहीर होताच महायुतीने 21-0 असा क्लीन स्वीप करत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. या निकालात महाविकास आघाडीला खातेही उघडता आले नाही.

निवडणुकीत शिवसेनेचे 17 उमेदवार विजयी तर भाजपचे  3 उमेदवार विजयी

महायुतीने खेड नगरपरिषद निवडणुकीत 21-0 असा ऐतिहासिक विजय मिळवल्यामुळं माधवी भुटाला या नगराध्यक्षा पदावर विराजमान होणार आहेत. जनतेने दिलेल्या या स्पष्ट कौलातून विकासाभिमुख नेतृत्वावरचा विश्वास अधोरेखित झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे 17 उमेदवार विजयी तर भाजपचे  3 उमेदवार विजयी झाले आहेत. 21-0 हा निकाल खेडच्या राजकारणात मैलाचा दगड ठरणारा असून, महायुतीच्या एकसंध नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास दर्शवतो.

महत्वाच्या बातम्या:

Ausa Nagar Parishad Result : मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अभिमन्यू पवारांना अजितदादांचा दणका, औसा नगरपालिकेत 17 जागांवर यश, नगराध्यक्षपदही जिंकले

आणखी वाचा

Comments are closed.