रत्नागिरी हादरली! चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करून व्हिडीओ केले व्हायरल, दोघांना अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरी शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार करून त्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी दोघा तरुणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घडली होती. जुबेर सलीम शेख (वय २२) आणि मुस्तकीन गडकरी (वय २४) या दोघांनी एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार केले. पीडित बालक घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्याने सुरुवातीला या प्रकाराची कल्पना आपल्या पालकांना दिली नव्हती. मात्र, नराधम आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. पीडित मुलाच्या वडिलांनी तो व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी जुबेर शेख आणि मुस्तकीन गडकरी या दोघांना अटक केली आहे.

Comments are closed.