Ratnagiri News – थ्री डी मल्टिमिडियाचा खर्च डोळे दिपवून टाकणारा, नगरपरिषदेला 8 लाखांचे उत्पन्न आणि खर्च 77 लाखांचा
रत्नागिरी नगर परिषदेने थिबा राजवाड्याच्या प्रांगणात सुरू केलेल्या थ्री डी मॅपिंग मल्टीमिडिया शो मधून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न आणि होणारा भला मोठा खर्चाचे आकडे डोळे दिपवून टाकणारे आहेत. थ्री डी मॅपिंग मल्टीमिडिया शो मधून रत्नागिरी नगर परिषदेला वर्षभरात ८ लाखांचे उत्पन्न मिळाले मात्र त्यासाठी ७७ लाख रूपयांचा खर्च मोजावा लागला आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने थ्री डी मल्टीमिडिया शो बाबत आजच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.
अतिक्रमण विरोधी आणि पथविक्रेत्यांवरील कारवाई बाबत गोंधळाचे वातावरण पहायला मिळाले. काही पथविक्रेत्यांवर कारवाई झाली तर काही पथविक्रेता रस्त्यावर करत असल्याची बाब नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिली. सर्वप्रथम हॉकर्स झोन तयार करा नंतरच पथविक्रेत्यांना हटवाने हॉकर्स झोन मध्ये पाठवा अशी भूमिका सभागृहात मांडण्यात आली.
उद्घाटनाआधीच खुर्च्या गंजल्या-अमित विलणकर
रत्नागिरी नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे काम न्याती कंपनीने केले आहे. इमारतीचे उद्घाटन होण्याआधी सभागृहातील खुर्च्यांना गंज पकडला आहे. या निकृष्ट कामाविषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक अमित विलणकर यांनी नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक राजू तोडणकर यांनी न्याती कंपनीच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करताना फडके उद्यानाचे काम आठ दिवसांत करतो म्हणून न्यातीचे अधिकारी मुल्ला यांनी सांगितले होते. मात्र चार महिने झाले तरी अजून काम केले नसल्याची नाराजी व्यक्त केली.आरोग्य विभागाकडून स्वच्छता स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा शहरात दोन विभागात घ्यावी.तसेच सर्व समान संख्येने स्वच्छता कर्मचारी द्यावेत अशी मागणी करण्यात आली.
Comments are closed.