रत्नागिरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक 10 मधील नगरसेवक पदाच्या निवडणुकीला स्थगिती

रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग क्र. 10 मधील नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. नगरसेवक पदाच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम 4 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील 4 नगरपरिषदा व 3 नगरपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. पैकी केवळ रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात प्रभाग क्रमांक 10 करिता दोन अपिले दाखल करण्यात आली होती व त्यांचा निकाल न्यायालयाकडून 25 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडील आदेशानुसार प्रभाग क्रमांक 10 मधील सदस्य पदाकरिता जाहीर करण्यात आलेली निवडणूक स्थगित करण्यात येत असून, त्याबाबतचा सुधारित निवडणूक कार्यक्रम 4 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल, याची नोंद संबंधित प्रभागातील मतदार व उमेदवारांनी घ्यावी, असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आहे. प्रभाग क्र १० मध्ये नगराध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे.

Comments are closed.