Ratnagiri News – चिऱ्यांतून फुलतेय जांभ्या पाषाणातील कला, संगमेश्वर तालुक्यातील कारागिरांची कौशल्यपूर्ण किमया!

छाया : मिनार झगडे संगमेश्वर

कलेला योग्य वाव मिळाला, की कलाकाराची उपजत प्रतिभा अधिक उजळते, याचे उत्तम उदाहरण संगमेश्वर तालुक्यात पाहायला मिळते. कोकणातील सुप्रसिद्ध जांभा दगड (चिऱ्यांचा दगड) हा येथील ओळख असून, या दगडातून बांधकाम करणारे अनेक कारागीर या भागात आढळतात. पण या चिऱ्यांतून केवळ इमारतीच नव्हे, तर कला साकारता येते, हे येथील कलाकारांनी सिद्ध करून दाखवले आहे.

कोळंबे आणि माभळे या गावांमध्ये चिऱ्यांचे बांधकाम करणारे कारागीर घराघरांत सापडतात. याच कोळंबे गावातील गंगाराम पडवळ यांनी लॉकडाऊनच्या काळात चिऱ्यांपासून सुंदर नक्षीकाम असलेला गेट तयार केलं. त्यांच्या या कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधले आणि त्यानंतर त्यांनी चिऱ्यांतून मंदिरांची नक्षीकामे व विविध कलात्मक रचना साकारण्यास सुरुवात केली.
गंगाराम पडवळ यांच्या या प्रयत्नात स्वप्निल गंगाराम पडवळ, मंगेश सखाराम जाधव, महेश सखाराम जाधव, दीपक पडवळ, विनायक पडवळ, विष्णू गीते, संजय पडवळ आणि रामचंद्र गीते यांनीही सहकार्य केले. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून चिऱ्यांच्या बांधकामातून अनोख्या नक्षीदार कलाकृती साकारल्या जात आहेत.

कोकणातील जांभा दगडाची नैसर्गिक सौंदर्यपूर्ण रचना आणि येथील कलाकारांची कल्पकता यांचा संगम होत असल्याने, संगमेश्वर तालुका आता चिऱ्यांच्या कलांसाठी नवे केंद्र म्हणून ओळख मिळवू लागला आहे.

चिऱ्यावर बांधकाम ही नाजूक कला; तरुणांनी जोपासल्यास रोजगाराची नवी दिशा उपलब्ध झाली आहे. या कलेचे वेगळे शिक्षण न घेता स्थानिक कलाकारांनी स्वत:च यात प्रगती केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. – गंगाराम पडवळ

चिऱ्यावर बांधकाम करणे हे अतिशय नाजूक आणि कौशल्यपूर्ण काम आहे. मात्र सराव, मेहनत आणि काम करण्याची तयारी असल्यास ते शक्य असल्याचे मत बांधकाम क्षेत्रातील अनुभवी कारागीर गंगाराम पडवळ यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, “आजची पिढी सुद्धा या कलेत रस घेते, पण अशी तरुणांची संख्या बोटावर मोजण्याएवढी आहे. जर तरुणांनी या कामात चिकाटीने प्रयत्न केले, तर या क्षेत्रात रोजगाराबरोबरच एक सुंदर कला जोपासता येऊ शकते.” असे गंगाराम पडवळ म्हणाले.

पडवळ यांनी सांगितले की, परंपरागत बांधकाम पद्धती जपण्यासाठी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या कलाविषयी जागरूकता वाढविण्याची गरज आहे. चिऱ्यावरील नक्षीकाम, अचूक बांधणी आणि टिकाऊपणा यामध्ये हिंदुस्थानी परंपरेचा ठसा असल्याचे त्यांनी नमूद केले. या कलेच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची संधी असल्याचे पडवळ यांनी सांगितले.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि जाखमाता मंदिरासमोर असणाऱ्या मारुती मंदिरा समोर अनेक वाहनचालक आपल्या ताब्यातील गाडी थांबून उदबत्ती लावून दर्शन घेत असत. असंख्य वाहन चालकांचा या मारुतीरायांवर मोठा विश्वास असल्याने तेथे नतमस्तक झाले शिवाय ते कधीही पुढे गेले नाहीत. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना येथे उड्डाणपूल आल्यामुळे मारुतीरायांचे स्थलांतर सर्व्हिसरोडकडे करण्यात आले आहे. परिणामी आता महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना मारुती मंदिरासमोर थांबणे काहीसे अवघड होणार आहे. असे असले तरी मारुतीरायांना मात्र पूर्वीपेक्षा उत्तम मंदिर बांधून मिळाले आहे.

Comments are closed.