Ratnagiri News – दहिवलीत दरडीखाली सापडलेल्या दोघांचे मृतदेह बाहेर काढले
खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी (6 जुलै 2026) रात्री झालेल्या भूस्खलनामुळे डोंगराचा भाग अचानक घरावर कोसळला, घरातील दोघेजण दरडीखाली गाडले गेले होते. त्या दोघांचे मृतदेह आज (7 जुलै 2026) सायंकाळी ढिगाऱ्यातून बाहेर काढले.
यामध्ये एका वृद्ध महिलेची सुटका करण्यात आली असून अन्य दोघांचा शोध अद्याप सुरू आहे. सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. डोंगरावरून माती आणि दगडांचा मोठा ढिगारा शेलार कुटुंबाच्या घरावर आल्याने घराचा काही भाग जमीनदोस्त झाला आणि घरातील तिघे जण ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. स्थानिकांच्या मदतीमुळे 75 वर्षीय कल्पना शेलार यांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना उपचारासाठी कळंबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, 85 वर्षीय शांताराम बाळा शेलार आणि 35 वर्षीय सतीश शेलार यांचा शोध घेण्याचे काम मंगळवारी उशिरापर्यंत सुरू होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास या दोघांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले.
Comments are closed.