Ratnagiri News – रत्नदुर्ग किल्ल्यावरून उडी घेत जीवन संपवणाऱ्या तरुणीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल

प्रेमप्रकरणातून रत्नदुर्ग किल्ल्यावरून उडी घेणाऱ्या तरुणीच्या प्रियकराविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जसस्मिक केहर सिंग असे प्रियकराचे नाव आहे. तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेपत्ता तरुणी सुखप्रित धालिवाल ही मूळची हरियाणाची असून सध्या नाशिक येथे बँकेत नोकरी करत होती. सुखप्रित तिच्या प्रियकराला भेटायला रत्नागिरीला आली होती. यादरम्यान ती रत्नदुर्ग किल्ल्यावर जात टोकाचं पाऊस उचललं. याप्रकरणी तरुणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत.

Comments are closed.