Ratnagiri News – भोस्ते घाट धोकादायक; महामार्गाला अवघड वळणावर भेगा, सिमेंट भरून तात्पुरती मलमपट्टी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील  खेड तालुक्यातील भोस्ते घाटातील अवघड वळणावर महामार्गाचा दरीकडील भाग खचू लागला असून नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर  खोल भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भेगा बुजवण्यासाठी संबंधित ठेकेदाराने सिमेंट भरून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. तडे पडण्याची मूळ समस्या दूर झालेली नाही. उलट जमिनीची खचण्याची प्रक्रिया सुरूच असल्याने भेगा पुन्हा दिसू लागल्या आहेत. शेकडो वाहने दररोज या मार्गावरून प्रवास करतात. अशा परिस्थितीत हा महामार्गावर वाहनचालकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. केवळ भेगा बुजवण्यापुरती तात्पुरती उपाययोजना न करता संरक्षणभिंत, उतार स्थिरीकरण आणि आवश्यक अभियांत्रिकी उपाय त्वरित राबविण्याची गरज वाहनचालक आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Comments are closed.