Ratnagiri News – रत्नागिरीत बाल अंतराळवीरांची सायकल सैर, किड्स सायक्लोथॉनचे यशस्वी आयोजन

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे पहिल्या किड्स सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यात बाल अंतराळवीरांनी सायकल चालवली. विविध ग्रह, खगोलशास्त्रज्ञांचे फोटो व माहिती आणि प्रतिकृती सायकलवर साकारून, तसेच काहींनी चांद्रयानाची प्रतिकृतीसुद्धा सायकलवर लावली. दोन गटातील बालदोस्तांनी पाच व दहा किमी सायकल चालवली. या उपक्रमाचे रत्नागिरीत प्रचंड कौतुक करण्यात येत आहे.
इस्रो, आयुका या संस्थांनी आणि ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी देखील हा देशातील पहिलाच उपक्रम असल्याबद्दल रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि सुवर्णसूर्य फाउंडेशनचे विशेष कौतुक केले. या उपक्रमाचे इतर शहरातही अनुकरण करण्याची सूचना त्यांनी केली आहे. खगोलशास्त्राची आवड निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचा उपयोग होईल, असे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
Comments are closed.