Ratnagiri News – श्रावण सोमवारनिमित्त शिवसेनेतर्फे भाविकांना खिचडी व केळी वाटप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार म्हणजे शिवभक्तीचा सांगता करणारा नव्हे, तर श्रद्धेला सेवेशी जोडणारा पवित्र क्षण. याच भक्तिभावातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण शहराच्या वतीने श्री रामेश्वर मंदिर, रामतीर्थ तलाव परिसर येथे भाविकांना खिचडी व केळी वाटपाचा उपक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

श्री देव रामेश्वर हे चिपळूणच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाशी नाते सांगणारे श्रद्धास्थान. शिवतत्त्व म्हणजे केवळ पूजाअर्चा नव्हे, तर त्याग, करुणा, समता आणि लोकसेवेची प्रेरणा. त्यामुळे रामेश्वराच्या चरणी आलेल्या भाविकांना अन्नप्रसाद देणे हीदेखील एका अर्थाने शिवसेवाच आहे. याच भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला सलग तिसऱ्या वर्षाची सेवापरंपरा लाभली आहे.

या उपक्रमासाठी विभागप्रमुख व नगरसेवक संजय गोताड, विभागप्रमुख रविराज चिपळूणकर आणि उपविभागप्रमुख दीपक कदम यांचे सौजन्य व विशेष सहकार्य लाभले. शहर सचिव प्रशांत मुळये यांनी नियोजनासाठी विशेष परिश्रम घेत, या सेवाकार्याला संघटनात्मक स्वरूप दिले. समाजातील विविध घटकांनी अशा उपक्रमांसाठी पुढे येणे ही सकारात्मक सामाजिक परंपरा असून, ती भविष्यातही अशीच सुरू राहावी, असे आवाहन करत त्यांनी सर्व सौजन्यकर्ते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Comments are closed.