Ratnagiri News – चेक बाऊंस प्रकरणात 39 लाख 50 हजार रूपयांचा दंड; रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील वाहन कर्ज प्रकरण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या देवरूख शाखेने दिलेल्या वाहन कर्ज प्रकरणात कर्जदाराचा धनादेश बाऊंस झाल्यामुळे कायदेशीर कारवाई सुरू होती. देवरूखच्या न्यायदंडाधिकारी वर्ग १ यांनी मुआज्जम महमंद साटविलकर यांना दोषी ठरवत ३९ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या देवरूख शाखेने मुआज्जम महमंद साटविलकर यांना वाहन कर्ज वितरित केले होते.कर्जाच्या वसुलीसाठी साटविलकर यांनी जिल्हा बॅंकेला धनादेश दिला होता.हा धनादेश बाऊंस झाल्यानंतर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने न्यायालयात धाव घेतली.रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वकील वाय.जी.चंदगडकर यांनी सादर केलेले दस्तऐवज आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने मुआज्जम महमंद साटविलकर यांना दोषी ठरवत ३९ लाख ५० हजार रुपयांचा दंड आणि साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

Comments are closed.