Ratnagiri news – एलईडी दिवे लावून मासेमारी करणारी नौका पकडली
मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान नियमित सागरी गस्तीदरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाने एलईडी दिवे लावून मासेमारी करणाऱ्या नौकेला सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या पथकाने पकडले.
परवाना अधिकारी स्मितल कांबळे या नियमित गस्त घालत असताना मासेमारी परवाना असलेली कैलास उल्हास कुबल (रा. राजवाडी, भगवती बंदर, ता. जि रत्नागिरी) यांच्या मालकीची मासेमार नौका “भराडी प्रसन्न” नोंदणी क्रमांक IND-MH-04-MM-3723 द्वारे महाराष्ट्राच्या सागरी जलधि क्षेत्रात मिऱ्या – काळबादेवी समोर एल. ई . डी दिवे वापरून मासेमारी करण्या हेतूने नांगरुन उभी असताना मत्स्य विभागामार्फत पकडण्यात आली. या नौकेवर तांडेलसह 5 खलाशी होते. सदर नौकेवर आढळलेले एल.ई .डी दिवे व जनरेटर नोकेसह मिरकरवाडा बंदरात जप्त करून ठेवण्यात आले आहे.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी .स्मितल कांबळे, सुरक्षा रक्षक सुजन पोवार व सागरी सुरक्षा रक्षक अमोल पिलणकर, अनिकेत पवार आणि भूषण करमरकर यांचे सहकार्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.
Comments are closed.