Ratnagiri News – मिरकरवाडा बंदरात एलईडी दिवे लावून मासेमारी, कारवाईची मागणी
मिरकरवाडा समुद्रकिनारी एलईडी दिवे लावून बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे. एलईडी दिवे लावण्यास बंदी असतानाही नियम धाब्यावर बसवून काही मच्छिमार मासेमारी करत आहेत. मासेमारी हंगामा सुरू होऊन महिना उलटला तोच समुद्रात एलईडी दिवे दिसू लागले आहेत. रात्री किनाऱ्यावरून हे एलईडी दिवे लावून मासेमारी करणाऱ्या नौका दिसतात. अशा मच्छीमार नौकांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक मच्छिमार करत आहेत.
मिरकरवाडा बंदरात एलईडी दिवे लावून सुरू असलेल्या मासेमारीवर कारवाई करण्यासाठी मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालय कोणते पाऊल उचलणार याकडे पारंपरिक मच्छिमारांचे लक्ष लागून राहिले आहे. एलईडी मासेमारीमुळे समुद्रातील मत्स्यसाठा धोक्यात येत आहे. यांत्रिकी मच्छिमार नौका एलईडी दिव्यांचा वापर करत असल्याने पारंपरिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
Comments are closed.