Ratnagiri news – कोतवडे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे बौध्दवाडी येथील सार्वजनिक विहिरीत बिबट्या पडला असे. विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने पिंजऱ्यांच्या सहाय्याने बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. सार्वजनिक विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती कोतवडे गावचे सरपंच संतोष बारगुडे यांनी वनविभागाला दिली त्यानंतर परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढले.

Comments are closed.