Ratnagiri News – संगमेश्वर-साखरपा राज्यमार्गावर साडवली येथे महाविकास आघाडीचा रास्ता रोको

संगमेश्वर-देवरुख-साखरपा या राज्य मार्गावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीच्या वतीने साडवली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. या 32 किलोमीटरच्या रस्त्याचे नव्याने पुनर्डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

हा रास्ता रोको माजी राज्यमंत्री रविंद्र माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाळ माने काँग्रेसचे अशोक जाधव, शिवसेन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम, रविंद्र डोळस, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, नेहा माने, वेदा फडके, युयुत्सु आर्ते, एश्वर्या घोसाळकर, काशीराम वाजे, नंदादिप बोरुकर, अजित गवाणकर, श्रीकृष्ण जागुष्टे, दादा शिंदे, दिपिका किर्वे, निलम हेगशेट्ये, अनुराग कोचीरकर, सागर संसारे, राजा मोहिते, संजय मोहिते, राजेंद्र मोहिते, राजेंद्र जाधव, निलेश भुवड, मेघा कदम, प्रदिप गुरव, प्रद्युम्न माने, इस्त्याक कापडी, मुन्ना थरवळ आदि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

जनतेच्या एक जुटीचा विजय असो.. महाविकास आघाडीचा विजय असो.. गेले कुठे गेले कुठे 32 कोटी गेले कुठे ..? अरे शोधू कुठे शोधू कुठे .. संगमेश्वर-साखरपा रस्ता शोधू कुठे .? संगमेश्वर-साखरपा रस्त्याचे पुनर्डांबरीकरण झालेच पाहिजे अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी देत महाविकास आघाडीच्यातर्फे बुधवारी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना हा रस्ता कधी बनवला गेला, त्यावर किती कोट टाकण्यात आले. देखभाल दुरुस्तीचा कार्यकाल कधीपर्यंत होता असे प्रश्न विचारण्यात आले. मात्र उप अभियंता जाधव यांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत. या राज्यमार्गाची 5 वर्षांची गँरंटी असताना ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. जनतेचा सहनशक्तीचा उद्रेक होण्याअगोदर या रस्त्याचे पुनर्नुतनीकरण तातडीने करावे, असा इशारा शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी साडवली येथील रास्ता रोको आंदोलनात दिला.

रस्ता कशा पद्धतीने करणार याचे लेखी उत्तर देण्यात यावे अशी मागणीही यावेळी माजी खासदार विनायक राऊत केली आहे. तर या रस्त्याच्या कामासाठी किती निधी वापरला गेला आणि किती निधी ठेकेदाराच्या खिशात गेला असा सवाल माजी राज्यमंत्री रविंद्र माने यांनी यावेळी उपस्थित करत सदर रस्त्याच्या दुरावस्थेबाबत संताप व्यक्त केला.

Comments are closed.