Ratnagiri News – संगमेश्वर येथे धावत्या बसवर दगडफेक, परिसरात खळबळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

धावत्या बसवर दगडफेक केल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे घडली. यात बसची मागच्या बाजूची काच फुटली. बसचालकाने तात्काळ बस थांबवून दगड मारणाऱ्या व्यक्तीला बस स्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षात नेले. यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

देवरूख आगाराची देवरूख-करजुवे ही बस संगमेश्वर बस स्थानकातून शनिवारी सकाळी 9.25 वा. सुटली. सोनवी पुलाखालून उजव्या बाजूला बस वळत असताना एका व्यक्तीने पाठीमागून धावत्या बसवर दगड भिरकावला. या घटनेत बसच्या मागील बाजूची काच संपूर्णपणे फुटली आहे. याबाबत पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. बसवर दगडफेकीच्या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Comments are closed.