आता पोलीस ग्रामसभेत येणार! पोलीस ठाण्यापुरतं मर्यादित न रहाता मिशन प्रबोधन जनतेमध्ये पोहचवणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कायदा सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता, सायबर गुन्हे, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, महिला व बालक सुरक्षा, वाहतूक सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा याबाबत नागरिकांमध्ये संवाद साधून जनजागृती करण्याची मोहीम रत्नागिरी पोलीस दल राबवत आहे. आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील 15 लाख नागरिकांपर्यंत जनजागृतीचा संदेश पोहचविण्यात आला आहे. आता पोलीस ठाण्यापुरतं मर्यादित न राहता पोलीस ग्रामसभेत येणार येऊन कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर मार्गदर्शन आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे

मिशन प्रबोधन अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सामाजिक जनजागृतीचा प्रवाह पोलीस ठाण्यापुरता मर्यादित न ठेवता तो ग्रामसभा, शाळा महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणे, नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामसभांच्या माध्यमातून ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून त्या सोडविण्यावर भर दिला जाणार आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर मार्गदर्शन आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. डायल 112, सायबर जागृती 1930, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी मिशन रायझिंग फ्लॉवर, गुन्ह्याच्या तपासातील प्रगतीबाबत मिशन प्रगती हेल्पलाइन 9112221632, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मिशन जीवन, नागरिकांच्या सूचना आणि तक्रारींसाठी मिशन प्रतिसाद हेल्पलाइन -9684708316, 8390929100, गतिमान पोलीस सेवेसाठी मिशन रॅपिड आणि वाहतुकीच्या नियमांसाठी मिशन टेप ॲण्ड सेफ मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या सहकार्यातून मिशन प्रबोधन मोहीम राबविण्यात येत आहे.

Comments are closed.