Ratnagiri News – अवैध खोदकामामुळे फगरवठारात संरक्षक भिंत कोसळली, सात घरांना धोका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरी शहरातील फगरवठार येथील संरक्षक भिंतीजवळ अवैध खोदकाम केल्यामुळे मंगळवारी सकाळी संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेमुळे परिसरातील सात घरांना धोका निर्माण झाला आहे. हे बेकायदेशीर खोदकाम कोण करत होते याची काडीमात्र खबर रत्नागिरी नगर परिषदेला नव्हती. आज सकाळी सहा वाजता ही घटना घडली.

फगरवठार येथील संरक्षक भिंत कोसळल्यामुळे रस्ताही खचला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. रस्ता खचल्याने शेजारी असलेले आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले. गेले काही दिवस संरक्षक भिंतीजवळ अज्ञात व्यक्ती खोदकाम करत होत्या. या खोदकामाला नगर परिषदेने परवानगी दिली नव्हती, तरीही हे बेकायदेशीर खोदकाम झाल्याने आज ही दुर्घटना घडली.

Comments are closed.