Ratnagiri News – जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत 13 ऑक्टोबरला

रत्नागिरी जिल्हापरिषदेचे 56 गट आणि पंचायत समितीच्या 112 गणासाठी सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता सोडत निघणार आहे. तसेच ९ पंचायत समित्यांची सोडत त्याच पंचायत समितीमध्ये होणार आहे. पंचायत समिती आरक्षण सोडतीच्या ठिकाणांची घोषणा करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी रत्नागिरी तहसिल कार्यालय इमारतीत जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये सभा घेण्यात येणार आहे.

सोडतीचे ठिकाण पुढीलप्रमाणे असणार आहेत.

  • मंडणगड पंचायत समिती – डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह, मंडणगड.
  • दापोली पंचायत समिती – नवभारत छत्रालय, शिंदे सभागृह दापोली.
  • खेड पंचायत समिती – श्री काळकाई मंदिर सभागृह पहिला मजला, भरणे नाका, खेड.
  • चिपळूण पंचायत समिती – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पंचायत समिती चिपळूण.
  • गुहागर पंचायत समिती – पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती कार्यालय, गुहागर.
  • रत्नागिरी पंचायत समिती – शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी.
  • संगमेश्वर पंचायत समिती – छत्रपती संभाजी महाराज सभागृह, पंचायत समिती संगमेश्वर (देवरुख).
  • लांजा पंचायत समिती – तहसीलदार कार्यालय सभागृह लांजा.
  • राजापूर पंचायत समिती – छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नगर परिषद राजापूर, मुंबई गोवा महामार्ग नजीक, राजापूर.

जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची सदर सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी व वेळेत हजर रहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Comments are closed.