Ratnagiri News – दापोलीत शिवजयंती उत्साहात; शिवसेना पक्ष संघटन वाढीसाठी रणशिंग फुंकले!
दापोली विधानसभा मतदारसंघ संघ ही काही कुणाची मक्तेदारी नाही. कुणी कितीही वल्गना केल्या तरी दापोली विधानसभा मतदार संघाच्या क्षितिजावरून कोणालाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नाव पुसता येणार नाही. दापोली आणि शिवसेना हे जणू समीकरणच होत आहे आणि यापुढे देखील राहील असे ठणकावत दापोलीत आता फक्त आणि फक्त शिवसेना एके शिवसेनाच असेल असे शिवसेना दापोली विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील यांनी म्हटले आहे. शिवसेना दापोली तालुका आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात त्यांनी शिवसेना संघटन वाढीचे रणशिंग फुंकले.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवराय, हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, हमारा नेता कैसा हो उद्धवजी ठाकरे जैसा हो, उध्दवजी ठाकरे आगे बडो हम तुम्हारे साथ है, आदित्य साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी दापोली दणाणून सोडली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय जाधव, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटिका मानसी विचारे, दापोली शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, शिवसेना खेड तालुकाप्रमुख दत्ता भिलारे, युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, खेड शहरप्रमुख शेखर पाटणे, खेड नगर परिषदेचे माजी गटनेते बाळा खेडेकर, दापोली शहरप्रमुख संदिप चव्हाण, अंकुश विचारे, दापोली युवासेना शहर सचिव साई मोरे, आयुब मसुरकर तसेच दापोली तालुक्यातील महिला, पुरुष आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने दापोली शिवसेना संपर्क कार्यालयात शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी विविध प्रकारच्या समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना शिवसेना दापोली विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील यांनी भेट दिली.
Comments are closed.