Ratnagiri news – देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी ७ हजाराची लाच घेताना उपअभियंता ACB च्या जाळ्यात

बांधकाम केलेल्या कामाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या गुहागर येथील उपअभियंता संजय सळमाखे(वर्ग १) याला ७ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.

ठेकेदाराच्या सुपरवायझरने केलेल्या बांधकामाचे प्रथम धावते देयक तयार केले. या देयकावर उपअभियंता संजय सळमाखे यांची स्वाक्षरी घेण्यासाठी ते गुहागर येथील कार्यालयात गेले होते. देयक आणि सोबत जोडलेल्या कामाच्या छायाचित्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी उपअभियंता संजय सळमाखे याने ७ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदार यांने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

मंगळवारी ७ हजार रुपये घेऊन स्वाक्षरी करण्याचे संजय सळमाखे याने मान्य केले. गुहागर येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयातील उपअभियंता यांच्या दालनात सात हजार रुपयांची लाच घेताना संजय सळमाखे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या पथकाने केली.

Comments are closed.