Ratnagiri News – आरे-वारे येथे पर्यटकांना मारहाण; ग्रामीण पोलिसांनी 48 तासात चौघांना ठोकल्या बेड्या
रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे समुद्रकिनारी दहीसर येथून आलेल्या पर्यटकांसोबत चार अनोळखी लोकांनी हुल्लडबाजी, दमदाटी आणि मारहाण केली होती. ही घटना 2 मे रोजी घडली होती. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी 48 तासांच्या आत त्या चौघांना ताब्यात घेतले आहे.
चार अनोळखी व्यक्ती दमदाटी आणि मारहाण करून पळून गेल्यानंतर दहीसर वरून आलेल्या त्या पर्यटकांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पर्यटकांवर होणाऱ्या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना आरोपींचा शोध घेण्याचा आदेश दिला होता. ग्रामीण पोलिसांची पथक तपासासाठी रवाना झाले. तांत्रिक बाजूने तपास करत पोलिसांनी त्या चौघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, उपनिरीक्षक अभय तेली आणि अमंलदार अजिंक्य पवार यांनी केली.
Comments are closed.