Ratnagiri News – ब्रेक निकामी झाल्याने रिक्षाटेम्पो पलटला, दोन जण जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरी शहरातील गवळीवाडा येथील तीव्र उतारात मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता रिक्षा टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्याने टेम्पो पलटी होउन अपघात झाला. या अपघातात चालकासह टेम्पोतील अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गवळी वाड्याकडील तीव्र उतारावरून धनजी नाक्याच्या दिशेने एक रिक्षा टेम्पो येत असताना अचानक टेम्पोचे ब्रेक निकामी झाले. तीव्र उतार असल्याने व ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्यामुळे टेम्पो गवळी वाड्यातील उतारात रस्त्‍याच्या कडेला पलटी होउन हा अपघात झाला. या परिसरात पादचाऱ्यांची व वाहनांची मोठी वर्दळ असते. ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने इतर वाहने आणि नागरिकांना वाचवण्यासाठी प्रसंगावधान दाखवत नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा टेम्पो इतर कोणालाही न धडकता उलटला आणि गर्दीच्या ठिकाणी होणारा मोठा अनर्थ टळला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वाहनातून बाहेर काढले. त्‍यांना उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. होते. परंतु त्‍यांना किरकोळ मुका मार लागल्याने त्‍यांच्यावर उपचार करुन त्‍यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. या अपघातात रिक्षा टेम्पोचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

Comments are closed.