Ratnagiri News – अज्ञात कारणातून तरुणाने जीवन संपवलं, संगमेश्वरमध्ये खळबळ
अज्ञात कारणातून एका तरुणाने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरानजिक असलेल्या ओझरे गावात घडली. मंदार केदार (25) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे ओझरे गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
मंदारने टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, लवकरच आत्महत्येचे नेमके कारण समोर येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Comments are closed.