Ratnagiri News – प्रेमसंबंधातून तरूणीचा आंबा घाटात खून, मृतदेहाचा शोध सुरू

प्रेमसंबंधातून रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील तरुणीचा तिच्या प्रियकराने आंबा घाटात खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या तरुणीच्या शोधादरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून आंबा घाटात मृतदेहाचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय तरुणी 10 दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता, त्यांना तरुणी आणि खंडाळा येथील एका तरूणाचे प्रेम संबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने संशयित तरुणाला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, पण कठोर चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे माहिती समोर आली आहे. स्थानिक पोलीस आणि गुन्हे अन्वेषण पथकाने तात्काळ आंबा घाटाकडे धाव घेतली आहे. आंबा घाटात मृतदेहाचा शोध सुरू आहे.
Comments are closed.