Ratnagiri News – महावितरणच्या हलगर्जीपणाचे दोन बळी, विद्युत तारांना स्पर्श होऊन तरुणांचा मृत्यू

महावितरणच्या पडलेल्या विद्युतभारीत तारांना स्पर्श झाल्याने वीजेचा धक्का बसून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी तालुक्यातील निवळी गावात घडली. हे दोन बळी महावितरणच्या हलगर्जीपणाचे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पडलेली विद्युतभारीत तार प्रवाहित राहिली होती. त्याचवेळी साफसफाईसाठी गेलेल्या चंद्रकांत तांबे आणि विद्युलता वासुदेव वाडकर यांना वीजेचा धक्का बसला. त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर महावितरणचा भोंगळ कारभार समोर आला आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या दोघांचा बळी गेला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Comments are closed.