रत्नागिरी पोलीसांच्या ‘रेडस’ ॲपचे पहिले यश, रत्नागिरीतून हरवलेली मुलगी इगतपुरी रेल्वे स्थानकात सापडली

रत्नागिरी पोलीस दलाने एआयचा वापर करून तयार केलेल्या रेडस ॲपला पहिले यश मिळाले आहे.रेडस ॲपच्या सहाय्याने हरवलेल्या मुलीचा शोध लागला आहे. 12 जानेवारी रोजी एक मुलगी हरवल्याची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.त्यानंतर पोलिसांनी रेडस ॲपमध्ये मिसिंग पोर्टलला त्या मुलीचे छायाचित्र अपलोड केला.तिच्या वेगवेगळ्या वेशभूषेतील 108 छायाचित्रे तयार करण्यात आली.आणि तपास अधिक प्रभावी करण्यात आला.

आधारित पोलीस अधीक्षकनितीन बगाटे यांच्या दूरदृष्टी व संकल्पनेतून साकारलेल्या रेडस अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने या प्रकरणातील तपासाला मोठी चालना मिळाली. या तांत्रिक मदतीच्या आधारे हरवलेली मुलगी इगतपुरी रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील व त्यांच्या तपास पथकाने तात्काळ कारवाई करत मुलीचा सुखरूप शोध घेण्यात यश मिळविले.

Comments are closed.