रत्नागिरीत शरद पवार गटाचा मोठा धक्का, प्रशांत यादव भाजपच्या गळाला, लवकरच करणार प्रवेश

रत्नागीरी: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रशांत यादव (Prashant Yadhav) हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णायाच मोठा फटका शरद पवार गटाला बसला आहे. संपूर्ण मतदार संघातील अनेक प्रमुख कार्यकर्ते माझ्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती प्रशांत यादव यांनी दिली आहे.

बदलत्या राजकीय परिस्थीमुळं पुढची दिशा ठरवण्यासाठी पक्षांतराची भूमिका घेतली

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रशांत यादव हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या 19 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढताना थोड्या मतांनी माझा पराभव झाला होता. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थीमुळं पुढची दिशा ठरवण्यासाठी पक्षांतराची भूमिका घेतल्याची माहिती प्रशांत यादव यांनी दिली.

शरद पवार किंवा त्यांच्या पक्षावर कोणतीही नाराजी नाही

शरद पवार किंवा त्यांच्या पक्षावर कोणतीही नाराजी नसल्याची माहिती प्रशांत यादव यांनी दिली आहे. त्यांना कल्पना देऊनच मी भाजपमध्ये पक्षप्रवेश करत असल्याचे प्रशांत यादव म्हणाले. प्रशांत यादव यांच्या रुपाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडले आहे. संपूर्ण मतदार संघातील अनेक प्रमुख कार्यकर्ते माझ्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रशांत यादव म्हणाले. 19 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याचे ते म्हणाले.

मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनीही केले होते प्रयत्न

प्रशांत यादव यांच्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनीही प्रयत्न केले होते. मात्र, प्रशांत यादव यांनी भाजपात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. पक्ष प्रवेशाच्या बातमीवर स्वतः प्रशांत यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोकणात महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षातील काही नेते पदाधिकारी सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेत आहेत. शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला देखील मोठे धक्के कोकणात बसले आहेत. अशातच रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रशांत यादव यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Sangli News: सांगलीत डिनर डिप्लोमोसी अन् बंद दाराआड चर्चा; पृथ्वीराज पाटलांनी शेवटी सोडला काँग्रेसचा हात, शहर जिल्हाध्यक्षांनी चव्हाणांसमोर व्यक्त केली खदखह, उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश

आणखी वाचा

Comments are closed.