Ratnagiri st bus accident at mandangad shenale ghat bus fall into konkan valley vvp96
रत्नागिरीतील मंडणगड शेनाळे घाटात एसटी बसचा अपघात झाला. दाभोळवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेनाळे घाटात अतितीव्र उताराचा रस्ता आहे. त्यापैकी एका उतारावरून ही एसटी बस जात असताना बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली.
रत्नागिरी : ‘देव तारी त्याला कोण मारी’ असाच काहीसा प्रकार रत्नागिरीतील शेळाने घाटात घडला आहे. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला. पण या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परिणामी मोठा अनर्थ टळला. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. (ratnagiri st bus accident at mandangad shenale ghat bus fall into konkan valley)
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील मंडणगड शेनाळे घाटात एसटी बसचा अपघात झाला. दाभोळवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेनाळे घाटात अतितीव्र उताराचा रस्ता आहे. त्यापैकी एका उतारावरून ही एसटी बस जात असताना बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. दरीतील झाडाझुडपांमधून ही एसटी बस खाली कोसळली. यावेळी एसटीचा प्रवास रात्रीचा असल्याने प्रवासी झोपेत होते. मात्र, बस दरीत कोसळताना प्रवाशांना जाग आली आणि त्यांना मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे या दरीच्या खालच्या बाजूला धरण होते. अपघातावेळी दरीत कोसळलेली बस आणखी खाली गेली असती तर, थेट धरणात कोसळली असती आणि अनेक प्रवाशांचा जीव जाण्याची शक्यता होती.
– Advertisement –
मात्र, ‘देव तारी त्याला कोण मारी’ असाच प्रकार या प्रवाशांसोबत घडला. कारण बस दरीत कोसळली तेव्हा दरीतील एका झाडला धडकली आणि तिथेच अडकली. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बचावपथक दाखल झाले आणि शर्तीच्या प्रयत्नांवर त्यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
या अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एसटी बसच्या मागच्या भागात अडकलेले प्रवासी दिसत असून ते इतर प्रवाशांना काही संदेश देताना पाहायला मिळत आहे. त्यानुसार, हे प्रवासी ज्यांना शक्य आहे, त्यांना बसमधून बाहेर पडा असे सांगत आहेत. जितक्या लोकांचा जीव वाचेल तेवढे जण वाचतील, तुम्ही बाहेर पडा, असे हे प्रवासी इतरांना सांगतानाचे व्हिडीओत ऐकायला येत आहे.
– Advertisement –
हेही वाचा – Drone for Illegal Fishing : राज्यातील अनधिकृत मासेमारीवर राहणार ड्रोनची नजर, काय म्हणाले नितेश राणे?
Comments are closed.