भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यास कोण मदत करू शकेल? रवी शास्त्रींनी घेतले ‘या’ खेळाडूचे नाव

गतविजेत्या भारताची आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मधील स्थिती पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. भारताने या स्पर्धेतील त्यांचा सुपर-८चा पहिला सामना गमावला आणि भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या अडचणीत वाढ झाली. यामुळे बाकी राहिलेल्या सामन्यांसाठी काय करता येईल याबद्दल भारताच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनी सल्ला दिला आहे.
या स्पर्धेत भारताचा रविवारी (२२ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी पराभव झाला. टी२० विश्वचषकात लागोपाठ १२ सामने जिंकल्यानंतर भारताचा हा पहिला पराभव ठरला. यामुळे संघाच्या कामगिरीत आता मोठा आणि चांगला बदल होईल, असे मत रवी शास्त्री यांनी केले आहे. या विश्वचषकात भारतात जे सामने खेळले गेले त्यामध्ये सर्वाधिक सामन्यांत स्पिनर्सचा बोलबाला राहिला आहे. यावरून शास्त्रींनी भारताला पुढच्या सामन्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.
“भारताने अक्षर पटेलला परत घेतले पाहिजे, कारण तुम्हाला तो अनुभव हवा आहे. मी तर म्हणतो की दोघांनाही (पटेल आणि सुंदर) खेळवा. स्वतःला तो अतिरिक्त पर्याय द्या, तुमच्याकडे एक गोलंदाज असेल ज्याला एक दिवस विश्रांती मिळेल,” असे शास्त्रींनी म्हटले आहे.
“जर ८ फलंदाज टी२०मध्ये चांगली कामगिरी करू शकत नाही, तर नक्कीच कुठेतरी चूक होत आहे. तुम्ही अतिरिक्त एका गोलंदाजांचा पर्याय ठेवत नाही, ज्यामुळे नुकसान होत आहे. रिंकू सिंग खेळण्याची शक्यता कमी आहे. पण तो खेळला, तर त्याला स्पेशालिस्ट बॅटरच्या जागी खेळावे लागेल,” असेही शास्त्रींनी पुढे म्हटले आहे.
रिकी पॉटींगनेही अक्षरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न घेतल्याबाबत मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, “विरोधी संघात डावखुरे फलंदाज अधिक असल्याने अक्षरला घेतले नाही, मात्र त्या संघात उजव्या हाताचे फलंदाजही होते. तेव्हा कर्णधाराने योग्यवेळी अक्षरला आणण्याचे काम करायचे होते.”
“आता सामना चेन्नईमध्ये होणार असून तेथिल परिस्थितीनुसार कोणता स्पिनर खेळवावा हा निर्णय घ्यावा लागेल. त्यामध्ये अक्षर उत्तम की कुलदीप यादव मग फलंदाज डावखुरा असो वा उजव्या हाताचा याने फरक पडणार नाही. तो चुकीचा गोलंदाजी करू शकतो आणि दोन्ही फलंदाजांच्या डाव्या हाताच्या बाहेरील कडावरून चेंडू जाऊ शकतो,” असेही पॉटींगने पुढे म्हटले आहे.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे सुपर-८चा सामना गुरूवारी (२६ फेब्रुवारी) चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे. यावेळी भारताच्या संघात कोणते बदल होतील याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
Comments are closed.