भारत दोन्ही वेळा WTC का जिंकू शकला नाही? रविचंद्रन अश्विनचा खुलासा, कोणाला ठरवले जबाबदार

भारतीय क्रिकेट संघाने (Indian cricket team) आतापर्यंत 2 वेळा वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप फायनल खेळला आहे, पण दोन्ही वेळा मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यापैकी एका फायनलमध्ये रविचंद्रन अश्विनसुद्धा (Ravichandran Ashwin) खेळला होता. अश्विनने खुलासा केला की, टीम इंडिया 2 वेळा फायनल गाठल्यानंतरही चँपियन का होऊ शकली नाही. त्याने मुख्य कारण IPL ला ठरवलं आहे.

2021 च्या फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला 8 विकेटने हरवले, तर 2 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभूत केला.

रविचंद्रन अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, IPL नंतर लगेच फायनल खेळणे सोपे नसते, आणि त्यामुळेच भारतीय टीम चँपियन बनू शकली नाही. तो म्हणाला, कसोटी क्रिकेटला पुरेसा मान आणि सराव मिळणे खूप महत्त्वाचे आहे.

भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI) मधील पहिला कसोटी सामना फक्त तिसऱ्या दिवशी संपला. त्या सामन्यात भारताने डाव आणि 140 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या कसोटीमध्येही वेस्ट इंडीजची परिस्थिती फारशी चांगली नाही.

अश्विन म्हणाला की, वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी कसोटी क्रिकेटकडे ज्या दृष्टीने पाहिले, तीच त्यांची मोठी समस्या आहे. भारतविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्याआधी वेस्ट इंडीजचे खेळाडू 22 सप्टेंबरपर्यंत CPL मध्ये व्यस्त होते. CPL संपल्याच्या काही दिवसांनंतरच ते भारतात आले. अशा परिस्थितीत त्यांना किती तयारीची संधी मिळाली असेल? संघाने कुठलीही नवीन तयारी केलेली नव्हती.

Comments are closed.