Ravindra chavan in bjp new president replace chadrashekhar bawankule-ssa97
Bjp New President : भाजपचे 12 जानेवारीला शिर्डीत अधिवेशन होणार आहे. त्यावेळी नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा होते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांचं नाव निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. पण, ही नियुक्ती लगेच की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एप्रिलमधील निवडणुकीनंतर होणार? हे अजूनही निश्चित झालेलं नाही.
रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीतून चौथ्यांदा निवडून आले आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. पण, फडणवीस सरकारमध्ये त्यांना संधी मिळाली नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली असून महसूलमंत्रिपद देण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वीच चव्हाण यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होते.
– Advertisement –
हेही वाचा : संतोष देशमुख प्रकरणातील तीन आरोपींचा मर्डर, कुणी केला धक्कादायक दावा
भाजपचे 12 जानेवारीला शिर्डीत अधिवेशन होणार आहे. त्यावेळी चव्हाण यांच्या नावाची घोषणा होते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जानेवारी महिन्यात चव्हाण यांची नियुक्ती केली, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्यांना वेळ मिळेल. परंतु, बावनकुळे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवावे, असं एक मत पक्षात असल्याचं बोललं जात आहे.
– Advertisement –
समतोल साधण्याचा प्रयत्न…
रवींद्र चव्हाण हे मराठा समाजाचे, तर बावनकुळे ओबीसी समाजाचे आहेत. बावनकुळे यांना मंत्रिमंडळात महसूलसारखं मोठे पद देण्यात आले आहेत. तर, चव्हाण यांच्या रूपानं मराठा समाजातील नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देऊन समतोल साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण, फडणवीस आणि दिल्लीतील नेतृत्त्व काय निर्णय घेतात? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा : अजित दादांच्या शिलेदाराने घेतली छगन भुजबळांची भेट; राज्यसभेवर जाण्याबद्दल काय म्हणाले
Comments are closed.