धक्कादायक ट्रेड! रवींद्र जडेजाने ठेवली कर्णधारपदाची अट, संजू सॅमसन होणार CSKचा नवा कॅप्टन?


रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन आयपीएल व्यापार: आयपीएल 2026 च्या अगोदर क्रिकेट चाहत्यांमध्ये एका बातमीची चांगलीच चर्चा रंगली आहे. समजतेय की चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या दोन मोठ्या संघांदरम्यान एका मोठ्या ट्रेडची चर्चा सुरू आहे. या डीलमध्ये तीन दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे, रविंद्र जडेजा, सॅम करन आणि संजू सॅमसन. जर ही डील फायनल झाली, तर जडेजा आणि करन राजस्थान रॉयल्सच्या जर्सीत दिसू शकतात, तर संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सचा भाग होऊ शकतात.

रवींद्र जडेजाने ठेवली कर्णधारपदाची अट

मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र जडेजाने राजस्थान रॉयल्ससमोर स्पष्ट अट ठेवली आहे, तो संघात तेव्हाच सामील होईल, जेव्हा त्याला संघाची कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाईल. 37 वर्षीय जडेजा आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि आता तो एखाद्या संघाचं नेतृत्व करत ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पाहतोय.

राजस्थान व्यवस्थापन सध्या या अटीवर विचार करत आहे. फ्रँचायझी याआधी यशस्वी जैस्वाल किंवा रियान पराग यांना भविष्यातील कर्णधार म्हणून तयार करण्याचा विचार करत होती, मात्र जडेजाच्या अनुभवामुळे आता त्यांच्या विचारसरणीत बदल होऊ शकतो.

संजू सॅमसन होणार CSKचा नवा कॅप्टन?

जर हा ट्रेड पूर्ण झाला, तर संजू सॅमसनचा चेन्नई सुपर किंग्समध्ये प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात आहे. सॅमसनची फलंदाजी आणि नेतृत्वक्षमता चेन्नईसाठी मोठा फायदा ठरू शकते. सध्या ऋतुराज गायकवाड संघाचे कर्णधार आहेत आणि फ्रँचायझीनं त्याला भविष्यातील कॅप्टन म्हणून घोषित केलेलं आहे. अशा स्थितीत संजूचा प्रवेश टॉप ऑर्डरला बळ देईल, मात्र तो भविष्यात कर्णधारपद स्वीकारतो का नाही, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये भावनिक नातं

रविंद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्सचं नातं खूप जुनं आहे. 2012 मध्ये संघात सामील झाल्यापासून त्याने अनेक संस्मरणीय कामगिरी केल्या आणि दोन वेळा संघाला ट्रॉफी जिंकून दिली. मात्र, 2022 मध्ये जेव्हा धोनीने कर्णधारपद सोडलं आणि जबाबदारी जडेजावर आली, तेव्हा संघाचं प्रदर्शन घसरलं. आठ सामन्यांत फक्त दोनच विजय मिळाल्यानंतर जडेजाने कप्तानी सोडण्याचा निर्णय घेतला होता.

ऑक्शनपूर्वी होणार मोठा निर्णय

आयपीएल 2026 च्या ऑक्शनपूर्वीच या मोठ्या ट्रेडचा निर्णय होण्याची शक्यता आहे. जर जडेजा राजस्थानकडे गेला आणि सॅमसन चेन्नईत आला, तर हा टूर्नामेंटमधील सर्वात मोठा ट्रेड ठरू शकतो. दोन्ही संघांचे चाहते आता या कर्णधार एक्सचेंजवर बीसीसीआयच्या शिक्क्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे ही वाचा –

PAK vs SL : पाकिस्तानातील स्फोटानंतर श्रीलंका संघ हादरला; संघाचे आठ खेळाडू मायदेशी परतले, सामना रद्द

आणखी वाचा

Comments are closed.