2 विकेट्स पटकावल्या, बाउंड्री लाईनवर उभा राहिला; चाहत्यांच्या घोषणा आणि रविंद्र जडेजा रडला, काळ

रवींद्र जडेजा भावनिक CSK VS RR IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) काल (30 मार्च) चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स (CSK VS RR IPL 2026) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने एकतर्फी विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 10 विकेट्स गमावत केवळ 127 धावा केल्या. राजस्थानने चेन्नईने दिलेल्या लक्षाचा पाठलाग केवळ 12.1 षटकातचं पूर्ण केला. राजस्थानने दोन विकेट्स गमावत 128 धावा केल्या. राजस्थानकडून वैभव सूर्यवंशी याने आक्रमक खेळी करत 17 चेंडूत 52 धावा केल्या. तर यशस्वी जैस्वालने 36 चेंडूत 38 धावा ठोकल्या. राजस्थानकडून रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने 3 षटक टाकत चेन्नईच्या महत्वाच्या दोन खेळाडूंच्या विकेट्स पटकावल्या. (CSK VS RR IPL 2026)

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यात चेन्नईकडून खेळणाऱ्या संजू सॅमसन आणि राजस्थानकडून खेळणाऱ्या रविंद्र जडेजाकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. कारण गेल्या अनेक वर्षांपासून रविंद्र जडेजा चेन्नईकडून खेळताना दिसला. तर संजू सॅमसन राजस्थानकडून आयपीएलमध्ये खेळताना दिसला. राजस्थानकडून खेळताना रविंद्र जडेजाने चांगली कामगिरी केली. परंतु संजू सॅसमनला चेन्नईसाठी चांगली कामगिरी करता आली आहे. संजू सॅमसनने फलंदाजी करताना फक्त 6 धावा केल्या. दरम्यान, चेन्नईविरुद्ध सामना खेळताना रविंद्र जडेजा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. रविंद्र जडेजाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Ravindra Jadeja Emotional Video CSK VS RR IPL 2026)

रविंद्र जडेजा भावूक, काळीज चिरणारा VIDEO: (Ravindra Jadeja Emotional Video)

रविंद्र जडेजाचा आयपीएल 2026 मध्ये चेन्नईविरुद्ध खेळताना अनुभव खूपच भावनिक ठरला. अनेक वर्षे चेन्नईकडून खेळल्यानंतर रविंद्र जडेजा जेव्हा प्रतिस्पर्धी संघातून मैदानात उतरला, तेव्हा चेन्नईच्या चाहत्यांनी “जड्डू-जड्डू” अशी घोषणा करत त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. हे पाहून जडेजा काही क्षण भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यांत अश्रूही दिसले. सध्या रविंद्र जडेजाचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रविंद्र जडेजाचा हा व्हिडीओ पाहून क्रिकेटप्रेमी देखील भावूक झाले आहे.

रविंद्र जडेजाने सरफराज खान आणि शिवम दुबेला केलं बाद- (CSK VS RR IPL 2026)

आयपीएल 2026 च्या ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपरकिंग्सने संजू सॅमसनला संघात घेण्यासाठी राजस्थान रॉयल्ससोबत रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना ट्रेड केलं होतं. त्यामुळे जवळपास 12 वर्षे चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा जडेजा राजस्थान रॉयल्ससोबत जोडला गेला. जडेजाने आठव्या ओव्हरला चेन्नई सुपरकिंग्सच्या दोन विकेट सुद्धा घेतल्या. रविंद्र जडेजाने सरफराज खान आणि शिवम दुबे यांना बाद केलं. दरम्यान जडेजाने विकेट घेतल्यावर गन फायर सारखं सेलिब्रेशन सुद्धा केलं.

संबंधित बातमी:

Ravindra Jadeja VIDEO : ज्या टीमला चॅम्पियन बनवलं, तिलाच जडेजाने एका ओव्हरमध्ये धुळीस मिळवलं! गोळ्या झाडत केलं फायरिंग सेलिब्रेशन

आणखी वाचा

Comments are closed.