रवींद्र जडेजा कसोटीतून घेणार निवृत्ती? इंस्टाग्राम स्टोरीमुळे चर्चांना उधाण
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) शुक्रवारी (10 जानेवारी) इंस्टाग्रामवर अशीच एक स्टोरी शेअर केली. ज्यामुळे चाहत्यांमध्ये त्याच्या कसोटी निवृत्तीबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. जडेजाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये आपल्या कसोटी जर्सीच्या टी-शर्टचा फोटो शेअर केला आहे. दरम्यान त्याने टी-शर्टच्या मागच्या भागाचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याचा जर्सी नंबर दिसत आहे. जर्सीचा फोटो पाहून चाहते असा अंदाज लावत आहेत की, जडेजा कसोटी क्रिकेटला अलविदा करणार आहे.
रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) पोस्ट केलेल्या जर्सीचा फोटो सिडनी कसोटीतील गुलाबी जर्सीचा आहे. अशा परिस्थितीत, जडेजाने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना सिडनीमध्ये खेळला होता का, याबद्दल सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चर्चा होयला लागल्या आहेत. खरे तर, 2024च्या टी20 विश्वचषकात भारताच्या ऐतिहासिक विजेतेपदानंतर रवींद्र जडेजाने या फॉरमॅटला अलविदा म्हटले होते.
आता तो केवळ कसोटीतच नाही तर वनडे सामन्यातही भारतीय जर्सी घालून खेळताना दिसतो. जर त्याने कसोटीला निरोप दिला तर चाहत्यांसाठी हा मोठा धक्का असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जडेजाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (ICC Champions Trophy) भारतीय संघातूनही वगळले जाऊ शकते. त्याच्या जागी संघ व्यवस्थापन अक्षर पटेल (Axar Patel) आणि वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) खेळवू शकतो. मात्र, हे होईल की नाही? हे भारतीय संघाच्या घोषणेनंतरच स्पष्ट होईल.
रवींद्र जडेजाच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली, तर ती उत्कृष्ट राहिली आहे. त्याने आतापर्यंत 80 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्याने चेंडूने अद्भुत कामगिरी दाखवली आहे. त्याने 323 फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाने फलंदाजीने अनेक संस्मरणीय खेळीही केल्या आहेत. फलंदाजीत त्याने 118 डावांमध्ये 4 शतकांसह 22 अर्धशतकेही झळकावली आहेत. दरम्यान त्याने 3,370 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा नाही, तर हा खेळाडू सर्वोत्कृष्ट कर्णधार, माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
RCBच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! बिग बॅश लीगमध्ये ‘या’ स्टार खेळाडूने पाडला धावांचा पाऊस
INDW vs IREW; भारताची विजयी सुरूवात, प्रतिका रावलची दमदार खेळी
Comments are closed.