IND vs WI: वेस्टइंडीज विरुद्ध रवींद्र जडेजाची अप्रतिम कामगिरी! शतकी खेळी करत केली एम एस धोनीची बरोबरी

भारत आणि वेस्टइंडिज (IND vs WI) दरम्यान सुरू असलेल्या 2 कसोटी सामन्यांचा मालिकेतील पहिला सामना अहमदाबादमध्ये 2 ऑक्टोबरपासून सुरु झाला. सामना दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) शानदार खेळी करत शतक ठोकले. त्याने हटके अंदाजात आनंदही साजरा केला. भारताकडून रवींद्र जडेजा सोबत केएल राहुल (KL Rahul & Dhruv jurel) आणि ध्रुव जुरेल यांनीही शतकं ठोकली. जडेजाने इंग्लंडमध्येही शानदार खेळी केली होती. या शतकामुळे त्याने एमएस धोनीच्या (MS Dhoni) रेकॉर्डची बराबरी केली.

सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या रवींद्र जडेजाने आधी ध्रुव जुरेलसह 200 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने शतक पूर्ण केले. वेस्टइंडिजच्या गोलंदाजांना जडेजाला दुसऱ्या दिवशी बाद करण्यास अपयश आले आणि तो दुसऱ्या दिवसाच्या शेवटपर्यंत नाबाद राहिला. जडेजाने 176 चेंडूत 104 धावा केल्या. आपल्या डावात त्याने 15 चौकार आणि 3 षटकार झळकावले. तसेच, त्याने आणखी 6 चौकार आणि 5 षटकारही केले. या शतकामुळे रवींद्र जडेजाने एमएस धोनींच्या कसोटी शतकांच्या (6 शतकं) बराबरी केली.

जडेजापूर्वी केएल राहुलने भारतासाठी शानदार शतक ठोकले. त्याने 197 चेंडूत 100 धावा केल्या. ध्रुव जुरेलनेही 210 चेंडूत 104 धावा केल्या आणि त्यात 15 चौकार व 5 षटकार समाविष्ट होते.

वेस्टइंडिजने पहिल्या डावात 44.1 षटकांत 162 धावा केल्या होत्या. टीमकडून जस्टिन ग्रीव्सने सर्वाधिक 32 धावा (48 चेंडूत) केल्या. तसेच शाई होपने 36 चेंडूत 26 धावा केल्या. केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजाच्या शतकी कामगिरीमुळे भारताने दुसऱ्या दिवसाच्या शेवटपर्यंत 5 गडी गमावून 448 धावा केल्या आहेत आणि 286 धावांची आघाडी मिळवली आहे.

Comments are closed.