वर्ल्डकप 2027मध्ये जडेजा खेळणार! आगरकर यांच्यावरही उपस्थित केले मोठे प्रश्न
भारतीय संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेरची वाट मोकळी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे फॅन्ससह क्रिकेट तज्ज्ञांचाही गोंधळ उडाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत कमाल कामगिरी करत असलेला रवींद्र जडेजा याने दिल्ली कसोटी दरम्यान या निर्णयावर पहिल्यांदाच आपले मत व्यक्त केले आहे. त्याने मुख्य चयनकर्ता अजीत आगरकर यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाच्या स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजाने विश्वचषक 2027 बाबत मोठे वक्तव्य केले आहे. वनडे संघातून बाहेर राहण्याबाबतच्या प्रश्नावर जडेजाने सांगितले, “मी वर्ल्ड कप 2027 नक्कीच खेळू इच्छितो. निवडीबाबत निर्णय घेतला गेला आहे. चांगली गोष्ट म्हणजे निवड होण्यापूर्वी सेलेक्टर आणि कर्णधार दोघांशी माझी चर्चा झाली होती. त्यांनी मला समजावले, पण कारण मला अजूनही नीट समजले नाही. वनडे वर्ल्ड कप जिंकणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.” जडेजाच्या या वक्तव्यानंतर आता भारतीय संघाच्या मुख्य चयनकर्ता अजीत अगरकर यांच्या वरती मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मागील 1 वर्षात रवींद्र जडेजा गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीतून वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये तर जडेजा फलंदाजीसह कमाल करत आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध चालू मालिकेच्या पहिल्या सामन्यात त्याने शतक ठोकल्यानंतर दुसऱ्या डावात 4 विकेटही घेतल्या होत्या. आता दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 3 विकेट घेतल्या आहेत. पहिल्या डावात फलंदाजी करण्याची त्याला संधी मिळालेली नाही.
Comments are closed.