Onion : कच्चा कांदा खाणे आरोग्यासाठी हानिकारक?

मांसाहाराचा बेत असेल तर कच्चा कांदा, लिंबू खाण्याने जेवणाची चव नक्कीच वाढते. त्यामुळे बरेचजण कांदा जेवणासोबत कच्चा खातात. कांदा आरोग्यासाठी फायदेशीर देखील आहे. कांद्यात सल्फर कंपाऊंड्स, क्वेर्सेटिन मुबलक प्रमाणात आढळतात, जे शरीरात ऑक्सिडेटिव्ह ताणाचा सामना करतात आणि हृदयाशी संबंधित समस्या कमी करतात. त्यामुळे बहुगुणी कांदा आवर्जून खाण्यात येतो. कच्चा कांदा खाण्याचे अनेक फायदे असले तरी, कच्चा कांदा सगळ्यांनाच खाणे फायदेशीर ठरते असे नाही. कारण कच्चा कांदा खाणे काहीजणांना महागात पडू शकते. आज आपण जाणून घेऊयात कच्चा कांदा खाणे कोणी टाळायला हवे.

कच्चा कांदा खाण्याचे फायदे –

  • कच्चा कांदा खाल्ल्याने खाज, पुरळ, सूज किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुमची त्वचा संवेदनशील असेल तर कच्चा कांदा खाताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
  • कच्चा कांदा जास्त प्रमाणात खाल्ल्यास आतड्यांना हानी पोहोचवू शकते. कच्च्या कांद्यामुळे शरीरात साल्मोनेला नावाच्या बॅक्टेरियाची समस्या उद्भवते, ज्यामुळे आरोग्याच्या विविध तक्रारी सुरू होतात.
  • कच्च्या कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असते. या घटकांमुळे ऍसिडीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त कच्चा कांदा खाणे टाळा.
  • तुम्हाला वारंवार पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवत असेल तर यामागे तुमची कच्चा कांदा खाण्याची सवय कारणीभूत असू शकते.
  • तुम्हाला वारंवार सर्दी-खोकल्याचा त्रास होत असेल तर कच्च्या कांद्यापासून दूर राहणे फायद्याचे ठरेल. कारण कच्चा कांदा खाल्ल्याने कफ वाढण्याची शक्यता अधिक असते.
  • जर तुम्हाला कोणत्याही थंड पदार्थांची ऍलर्जी असेल तर कच्चा कांदा खाणे टाळावे. यामुळे समस्या आणखी वाढू शकते.

 

 

 

हेही पाहा –

Comments are closed.