ATM मध्ये नोटांची टंचाई, आरबीआयची तक्रारी येताच कठोर भूमिका, बँकांकडून डेटा मागवला
एटीएम रोख नवी दिल्ली : डिजीटल बँकिंगची सुविधा उपलब्ध झाल्यानं बँकेतील अनेक कामं आता सोपी झाली आहेत. काही वर्षांपूर्वी बँकेतून पैसे काढायचे असल्यास बँकेत रांगा लावाव्या लागायच्या. यानंतर देशभरात एटीएमचं जाळं विस्तारल्यानं बँकांमधील पैसे काढण्याच्या रांगा कमी झाल्या. आता यूपीआय प्लॅटफॉर्म्सवरुन मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात. मात्र, देशातील काही राज्यांमध्ये एटीएममध्ये नोटांचा तुटवडा असल्याचं समोर आलं आहे. काही शहरांमध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून एटीएममध्ये नोटा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. वारंवार तक्रारी येत असल्यानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं यासंदर्भात चौकशी सुरु केली आहे.
RBI नं बँकांकडून डेटा मागवला
एनडीटीव्ही प्रॉफिटनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार आरबीआयनं एटीएममधील नोटा टंचाईच्यासंदर्भात सर्व बँकांना टिअर-2 आणि त्या पेक्षा छोट्या शहरांमधील उपलब्ध कॅश संदर्भातील माहिती मागवली आहे. आरबीआयला यातून कोणत्या ठिकाणी एटीएममध्ये नोटा उपलब्ध नसल्यासंदर्भातील माहिती मिळे काही बँकांकडून छोट्या शहरांमध्ये खूप कमी प्रमाणात एटीएममध्ये नोटा लोड केल्या किंवा वेळेत नोटा लोड केल्या नाहीत यासंदर्भात माहिती मिळवण्याचा आरबीआयचा प्रयत्न आहे. आरबीआयनं एटीएममधील नोटा टंचाई संदर्भातील तक्रारीत तथ्य आढळल्यास कारवाई केली जाऊ शकते, असंही आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.
बँकांनी काय म्हटलं?
या प्रकरणात काही बँकांनी म्हटलं की केवळ कॅशचा स्टॉक पाहून स्थिती सांगता येत नाही. बँकांच्या भूमिकेनुसार ज्या नोटा खराब आणि फाटलेल्या असतात त्या एटीएममध्ये टाकता येत नाहीत.
कोणत्या राज्यांमधून तक्रारी?
एटीएममध्ये नोटा उपलब्ध नसल्याच्या बहुतांश तक्रारी ग्रामीण भागात आणि निम शहरी भागातून येत आहेत. आंध्र प्रदेश,तेलंगाणा,
कर्नाटक या राज्यांमध्ये एटीएममध्ये नोटा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत आहेत.
Comments are closed.